पवित्र पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करताना कोणती कागदपत्र लागतात? कोण असेल पात्र कुठे भरता येईल फॉर्म सर्व माहिती पहा 

 पवित्र पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करताना कोणती कागदपत्र लागतात? कोण असेल पात्र कुठे भरता येईल फॉर्म सर्व माहिती पहा 

शिक्षक भरतीसाठी सर्व उमेदवारांना पवित्र पोर्टल वरती नोंदणी करणे अनिवार्य आहे त्यामुळे जे विद्यार्थी TAIT परीक्षा उत्तीर्ण आहेत किंवा दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टल वरती नोंदणी करणे बंधनकारक आहे याची नोंदणी सुरू झालेली असून विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टल वरती नोंदणी करून घेणे. जे विद्यार्थी पवित्र पोर्टल वरती नोंदणी करतील त्यांच्यासाठी पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या गुणांचा विचार करून त्यांना शाळेचे पर्याय टाकण्यासाठी ऑप्शन दिले जाते. पवित्र पोर्टल वरती नोंदणी करत असताना विद्यार्थ्यांना खालील कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

शैक्षणिक कागदपत्र

 1. दहावी सनद व गुणपत्रक
 2. बारावी सनद व गुणपत्रक
 3. पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक (ग्रॅज्युएशन) (12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचे)
 4. पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र व गुणपत्रक (12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचे)
 5. डिप्लोमा गुणपत्रक – D.ed (12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचे)
 6. पोस्ट डिग्री डिप्लोमा गुणपत्रक- B.ed,M.ed,Mped  (12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचे)
 7. डोमासाईल प्रमाणपत्र (12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचे)
 8. जात प्रमाणपत्र (12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचे) लागू असेल तर
 9. नॉन क्रिमिलियर ओपन एससी एसटी जात वगळून(12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचे)
 10. ई डब्ल्यू एस (12 फेब्रुवारी 2023पूर्वीचे) फक्त ओपन साठी
 11. एम एस सी आय टी प्रमाणपत्र (झाली असेल तर)
 12. एक पासपोर्ट फोटो
 13. अर्जदार यांची सही
 14. TAIT गुणपत्रक/प्रमाणपत्र
 15. CTET गुणपत्रक/प्रमाणपत्र
 16. टी ई टी गुणपत्र/प्रमाणपत्र

इतर कागदपत्र पुरावा (जे लागू असेल ते सोबत अपलोड करणे)

 • अनाथ प्रमाणपत्र
 • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
 • अपंग प्रमाणपत्र
 • माजी सैनिक प्रमाणपत्र
 • पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र
 • शेतकरी आत्महत्या कुटुंबातील प्रमाणपत्र
 • कुटुंब प्रमाणपत्र
 • महिला आरक्षण
 • प्राविण्य प्राप्त खेळाडू असल्याचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे वरदान या अहवालात व पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती
 • भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र

वरीलपैकी जे कागदपत्र आपणास लागू असतील ते सर्व कागदपत्र एकतीस मार्च 2023 पूर्वीचे असणे गरजेचे आहे तरच आपण यासाठी पात्र असू शकतात.

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तसेच सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खालील ठिकाणी भेट द्या

संपर्क कार्यालय : ओम कॉम्प्युटर्स, बस स्टँड जवळ गढी तालुका गेवराई जिल्हा बीड

www.shikhoyaro.com

www.ghemahiti.in

 

Leave a Comment